कोकण

हवामान बदलाचा सिंधुदुर्गात अभ्यास

CD

swt41.jpg
41272
कुडाळ : हवामान बदल, वाढते पर्यटनाचा अभ्यास संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे घेण्यात आला.


हवामान बदलाचा सिंधुदुर्गात अभ्यास
किनारपट्टीवर लक्ष: पर्यटन, दुर्घटनांची करणेही शोधणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ : जिल्ह्यात वाढत्या पर्यटना बरोबरच हवामान बदलासह समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, याची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच एका विशेष शास्त्रीय अभ्यासाचे आयोजन करण्यात आले.हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा स्थानिक उपजीविकेवर काय परिणाम होत आहे, याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढला जाणार आहे.
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, मुंबईची टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) आणि रेसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेअंतर्गत २५ आणि २६ एप्रिल अशी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यशाळा आयोजित केली होती. पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या डॉ. अनुराधा गावडे यांनी जिल्ह्याच्या भू-आकृतीशास्त्रावर माहिती दिली, तर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रा. राजश्री यांनी अभ्यासाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सह-संशोधक प्रा. महेश कांबळे यांनी आपत्ती विषयक संकल्पना आणि सर्वेक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. अर्चना दिवटे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मुलाखती आणि गट चर्चेद्वारे माहिती संकलन करण्याचे प्रशिक्षण दिले.
या उपक्रमासाठी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्यासह डॉ. रवींद्र गावडे, प्रा. महेंद्र कांबळे, डॉ. अर्चना दिवटे व ब्रिनिलिया डिसोझा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

चौकट
असा केला अभ्यास...
▪ मालवण तालुक्यातील दांडी, तारकर्ली, आचरा, तोंडवली, तळाशील व वायरी-भूतनाथ या सहा गावांची अभ्यासासाठी निवड
▪ २७ व २८ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रभेट
▪ स्थानिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे गावांमध्ये राहून निरीक्षण
▪ स्थानिकांच्या धारणा, पारंपरिक ज्ञान व आपत्ती प्रतिसादाचा अभ्यास
▪ हवामान बदल व मानवी हस्तक्षेपाचा उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
▪ भविष्यात बुडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अभ्यास उपयुक्त ठरण्याची अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT