कोकण

जिल्ह्यातील प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

CD

swt415.jpg
41277
चौके : येथील शिवसैनिक यांच्यावतीने ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.


जिल्ह्यातील प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष
माजी आमदार वैभव नाईक : तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मी आज आमदार नसलो तरी लोकांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच लोकांसोबत आहे. लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर त्यासाठी आंदोलन करण्याची शिवसेना पक्षाची भूमिका असते. आज जिल्ह्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत. जिल्ह्यात चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून आम्ही कुडाळ मध्ये महिला बाल रुग्णालय उभारले. ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरु केले. परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. अदानीच्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू लिलाव न झाल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यासाठी आता तीव्र आंदोलने करावी लागणार आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन श्री. नाईक यांनी केले.
मालवण तालुका तसेच चौके विभागातील शिवसैनिक आणि विनोद सांडव मित्रमंडळाच्या वतीने चौके येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरी खोबरेकर, मंदार गावडे, मनोज मोंडकर, दिनेश चव्हाण, बिजेंद्र गावडे, अजित पार्टे, विनोद सांडव, वंदेश ढोलम, विनायक गावडे, गणेश गावडे, दिनेश कदम, शेखर कदम, महेश धुरी, किरण भिसे, किशोर पाताडे, डॉ. प्रताप पवार आदी उपस्थित होते.

चौकट
शिवसेना पुन्हा बळकट होईल
हरी खोबरेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला सक्षम नेतृत्वाची गरज होती. उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्या खांद्यावर ती जबाबदारी सोपवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा बळकट होऊन शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चौकट
या आहेत समस्या...
▪ सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात आरोग्य समस्या तीव्र
▪ अदानीच्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलाचा फटका
▪ वाळू लिलाव रखडल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड
▪ पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न अद्याप प्रलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT