कोकण

डझनाची विक्री आली शेकड्यावर

CD

-rat४p१४.jpg-
26O41287
चिपळूण : गुहागर नाका येथे आता शेकडा दराने हापूस आंब्याची विक्री सुरू आहे.
-----
डझनाची विक्री आली शेकड्यावर
चिपळुणातील स्थिती; हापूसचा चार ते सहा हजारपर्यंत दर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः अवकाळी पावसाच्या भीतीने डझनावर विकला जाणारा हापूस आंबा आता शेकड्यावर विकला जात आहे. ४ हजारापासून ६ हजार रुपये शेकडापर्यंत हापूसला दर मिळत आहे.
चिपळूण शहरातील गुहागर नाका आणि भेंडीनाका परिसरात चार ते पाच हजार नग आंब्याची विक्री होत आहे. यातून लाखोंची उलाढाल या परिसरात होत आहे. तालुक्याच्या खाडीपट्टा भागातील आंबा येथे विक्रीसाठी येत आहे. येथे आंबा खरेदीसाठी चिपळूण, गुहागर, संगमेश्वर भागातील ग्राहक आणि विक्रेते येत आहेत. गुहागर नाका आणि भेंडीनाका हे दोन्ही नाके गुहागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येतात. सुटीच्या काळात गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे गुहागरमधून पर्यटनाचा आनंद घेऊन परतीच्या मार्गावर असलेले पर्यटक या नाक्यावर थांबतात आणि आंब्याची खरेदी करून घरी परततात. त्यामुळे आंबाविक्रीसाठी हे नाके प्रसिद्ध झाले आहेत. रत्नागिरीतील पावस, गणपतीपुळे आणि दापोली भागातील आंबा बागायतदारसुद्धा येथे आंबाविक्रीचे स्टॉल लावत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा हापूस आंबा उत्पादनाला बसला. संपूर्ण तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीचे आहे. यातील केवळ दहा टक्के क्षेत्रावरच यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी आंब्याचे उत्पादन साधारण ४० टक्के होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले. उत्पादनातील या त्रुटीमुळे सुरुवातीला बाजारपेठेत हापूसच्या भावात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी शेवटच्या हंगामात पाचशे ते सातशे रुपये डझन दराने मिळणारा आंबा यावर्षी थेट १५०० ते १७०० रुपये डझन या दराने विकला जाऊ लागला. आखाती देशातील युद्धामुळे हापूस आंब्याचे दर कमी होईल, असे वाटत होते; परंतु आंब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे दरात मोठी वाढ झाली. आता आंब्याचा दर हळूहळू कमी होऊ लागला. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची भीती आहे. बागांमध्ये सध्या आंबा तयार झाला आहे तो बाजारपेठेत गेला नाही आणि त्याच दरम्यान पाऊस झाला तर आंब्याला दर मिळणार नाही, या भीतीने बागायतदार आता बाजारपेठेत शेकडा दराने आंबा विकत आहेत. लहान फळ साडेतीन हजार रुपये शेकडा आणि मोठे फळ पाच ते सहा हजार रुपये शेकडा या दराने चिपळूणमध्ये आंब्याची विक्री सुरू आहे.
----
कोट
खाडीपट्टा भागातील आंब्याला चव वेगळी असते. हा आंबा नेहमी मे महिन्यात मार्केटमध्ये येतो. आमचे ग्राहक ठरलेले आहेत. ते दरवर्षी न चुकता आंबा घेऊन जातात. आमच्याकडून ग्राहकांना दिले जाणारे फळ हे खात्रीशीर असते त्यामुळे ग्राहक विश्वासाने फोन करून आंबा घेण्यासाठी येतात. दरामध्ये कोणतीही घासाघीस होत नाही.

- इफ्तिकार तांबे, मालदोली, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT