कोकण

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी गावठी आठवडा बाजार

CD

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी आठवडा बाजार
हक्काची बाजारपेठ : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ९ मे रोजी होणार उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदूर्गनगरी, ता. ४ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा, या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशीमधील लोकांच्या सोयीसाठी दर शनिवारी ‘अस्सल गावठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. ९ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या गावठी बाजाराचे उद्‌घाटन केले जाणार आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील बसस्थानकाच्या बाजूलाच हा गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. या गावठी बाजारामध्ये स्थानिक सेंद्रिय शेती माल विक्री, थेट शेतकरी ते ग्राहक विक्री अशा पद्धतीने गावठी बाजार भरविला जाणार आहे. या गावठी बाजारामुळे पंचक्रोशीतील लोकांना ताजी भाजी, वेगवेगळी फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गावठी कडधान्य बाजारात मिळणार आहेत. लोकांना सेंद्रिय पद्धतीचे सर्व प्रकारचे धान्य व भाजी मिळणार आहे. त्यामुळे लोकांची तर सोय होईलच त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या गावठी आठवडा बाजारामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पादित केलेला माल विक्रीसाठी आणावा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी खरेदी करून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ पर्यंत अस्सल गावठी आठवडा बाजार भरविला जाणार आहे. या पहिल्याच आठवडा बाजाराचे उद्‌घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असून सोबतच सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण सदस्य व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, प्राधिकरण सदस्य छोटू पारकर, उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT