swt68.jpg
41776
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना राजन नाईक. बाजूला विष्णू चौकेकर, रमेश नरसुले, भास्कर केरवडेकर, अनघा तेंडोलकर, अरविंद तेंडोलकर, अनिल तोंडवलकर, बाळ कनयाळकर व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ येथे रविवारी देवळी समाज मेळावा
राजन नाईक ः समाजातील कर्तृत्वान व्यक्तींचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील देवळी समाज बांधवांना संघटित करण्यासाठी आणि समाजातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी रविवारी (ता. १०) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत येथील महालक्ष्मी सभागृहात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत समाजाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी दिली.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजन नाईक असणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुडाळ एमआयडीसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या मेळाव्यात बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम, ‘दशावतारी’ कलाकार, नवनियुक्त लोकप्रतिनिधी, वधू-वर नोंदणी व वधू-वर सूचक उपक्रम राबवण्यात येणार आहे. समाज संघटन, अनिष्ट रुढी-परंपरांचे उच्चाटन, कुशल तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या मेळाव्याचा उद्देश आहे. ओबीसी अंतर्गत मिळणाऱ्या शासकीय सवलतींबाबतही मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांनी आणि वधू-वरांनी नोंदणी राजन नाईक (अध्यक्ष), रमेश पिंगुळकर यांच्याकडे करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी विष्णू चौकेकर, रमेश नरसुले, भास्कर केरवडेकर, अनघा तेंडोलकर, अरविंद तेंडोलकर, अनिल तोंडवलकर, बाळ कन्याळकर, नागेश ओरसकर आदी उपस्थित होते.