‘फरा’ प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
विधायक कार्याची दखल ः सावंतवाडीत २९ जुलैला वितरण
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ६ : केर गावातील आदर्श शिक्षक (कै.) फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १५ व्या वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण २९ जुलैला सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सोनू गवस, रामा ठाकूर, तेजस देसाई उपस्थित होते. यंदाच्या या पुरस्कारांचे वितरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या विशेष उपस्थितीत होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हे पुरस्कार गेल्या चौदा वर्षांपासून देण्यात येत आहेत. यंदाच्या १५ व्या वर्षी घोषित केलेले पुरस्कार असे, आदर्श शिक्षक-तेजस बांदिवडेकर (मुख्याध्यापक, सुधाताई कामत प्राथमिक शाळा क्र. २, माठेवाडा, ता. सावंतवाडी), अध्यापन भास्कर-राजेंद्र देसाई (मुख्याध्यापक, ओटवणे हायस्कूल, ता. सावंतवाडी), स्नेहा विष्णू स्मृती नाट्य रंगकर्मी-केदार सामंत (ता. कुडाळ), हेमावती स्मृती महिला स्वावलंबन-प्रणाली गावडे (पीएनजी माणगाव ता. कुडाळ), आदर्श पत्रकारिता-संतोष वायंगणकर (पत्रकार), आदर्श कृषिरत्न-संतोष गावडे (रानबांबोळी, ओरोस, ता. कुडाळ), आरोग्यसेवा-डॉ. संजय का. बर्वे (बांदा, ता. सावंतवाडी), आदर्श ग्रामसेवा-हेमा नाईक (मोरगाव, ता. दोडामार्ग), शैला भास्कर स्मृती दिव्यांग पुरस्कार-शैलजा पांढरे (आजगाव, ता. सावंतवाडी), संगीता शामसुंदर स्मृती आदर्श संगीत/भजनी सेवा पुरस्कार- बाबुराव गवस (पाल पुनर्वसन, ता. दोडामार्ग), आदर्श स्मार्टग्राम-सत्यविजय गावडे (सरपंच, ग्रामपंचायत अणसूर, ता. वेंगुर्ले), आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा-दीपेश परब ( पेंडूर, ता. वेंगुर्ले), आदर्श आध्यात्म-पुरुषोत्तम पोखरणकर (पोखरण, ता. कुडाळ), आदर्श ग्रामरत्न-हरिश्चंद्र उर्फ बबन कदम (वेताळबांबर्डे, ता. कुडाळ), आदर्श भारतमाता सेवा-सुभेदार अजय परब (सरगवे पुनर्वसन, ता. दोडामार्ग), आदर्श जीवनगौरव-नंदकुमार पाटील (सिने अभिनेते). बालकलाकार-संतोष देसाई (केर, ता. दोडामार्ग), तन्मय सावंत (हेदुसवाडी-सासोली, ता. दोडामार्ग) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.