कोकण

धाकोरेत गडगा तोडल्या प्रकरणी ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

गडगा तोडल्याप्रकरणी ४१ जणांवर गुन्हा
धाकोरेतील घटना ः न्यायप्रविष्ट वाद असूनही खासगी जमिनीत घुसून नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ : धाकोरे-चव्हाटावाडी (ता. सावंतवाडी) येथे रस्ता वादातून गडगा पडल्याप्रकरणी, तसेच शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरती व्यंकटेश प्रभुराळकर यांनी शिरोडा पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. जिल्हा न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही ५० ते ६० लोकांच्या जमावाने खासगी जमिनीत घुसून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्रभुराळकर यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा, धाकोरे येथील त्यांच्या जमिनीबाबत जिल्हा न्यायालयात दावा प्रलंबित आहे. या जमिनीतील कथित ‘गोवंड’शी (वाटेच्या) संबंधित हा ग्रामपंचायत व काही ग्रामस्थांशी प्रभुराळकर यांचा वाद आहे. न्यायालयाने या जागेवर रस्ता करण्यास किंवा वहिवाटीत अडथळा आणण्यास स्थगिती दिलेली असतानाही, २४ एप्रिलला दुपारी १२.३० च्या सुमारास वादाला सुरुवात झाली. तक्रारदार प्रभुराळकर व त्यांचा मुलगा साहिल हे जागेची हद्द दाखवत असताना संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण केली. साहिलचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर प्रभुराळकर यांनी लागलीच ‘डायल ११२’ वरून पोलिसांना पाचारण केले. प्रभुराळकर या पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असताना, दुपारी ३.५० च्या सुमारास ५० ते ६० लोकांच्या जमावाने त्यांच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश केला. जमावाने सुमारे ७० मीटर लांबीचा दगडांचा कच्चा गडगा, ग्रीननेट आणि प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट तोडून टाकले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, जमावाने टिकाव, खोरी व इतर साहित्यही चोरून नेल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी चंद्रकांत मुळीक, एकनाथ मुळीक, नामदेव मुळीक, सदानंद गवस, प्रदीप गोवेकर, दिगंबर गोवेकर, अनिल नाईक, महेश साटेलकर, विनायक मुळीक, संजय पालयेकर आदी ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT