कोकण

सावंतवाडी येथे मंगळवारी सावंत, परब यांचा सत्कार

CD

wt615.jpg
41803
संजय सावंत, भाग्यश्री परब

सावंतवाडी येथे मंगळवारी
सावंत, परब यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः जिल्ह्यातील पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेत, शासनातर्फे नवनियुक्त जिल्हा वन्यजीव रक्षक यांचा भव्य सत्कार समारंभ आणि विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनातर्फे पुढील तीन वर्षांकरिता ''जिल्हा वन्यजीव रक्षक'' म्हणून निवड झालेल्या दोन नामवंत तज्ज्ञांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये तिलारी (दोडामार्ग) येथील वन्यजीव तज्ज्ञ संजय सावंत आणि रानबांबुळी येथील पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे. सत्कार समारंभानंतर ''जैवविविधता आणि सिंधुदुर्गातील वन्यजीवन'' या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे. या सत्रात जिल्ह्यातील पर्यावरणापुढील आव्हाने आणि संवर्धनाच्या संधी यावर सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT