swt624.jpg
41829
सलोनी बागवे
swt625.jpg
41830
सान्वी जाधव
swt626.jpg
41831
स्वानंद मेस्त्री
swt627.jpg
41832
अर्णव खरात
swt628.jpg
41833
ओवी मेस्त्री
जिल्हास्तरीय डॉट कॉम्स
परीक्षेचा निकाल जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित ''सिंधुभूषण पुरस्कार २०२६'' साठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात खुला गटातून सलोनी बागवे (कुडाळ), सातवी-आठवी गटात सान्वी जाधव (विद्यामंदिर कणकवली), पाचवी-सहावी गटातून स्वानंद मेस्त्री (दाभोली क्र. १), तिसरी-चौथी गटात अर्णव खरात (शाळा कांदुळी), पहिली-दुसरी गटामध्ये ओवी मेस्त्री (शाळा ओरोस मुख्यालय) यांनी प्रथम क्रमांक पटकावत ''सिंधुभूषण'' बहुमान मिळविला.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख ११११ रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
गुणवंत स्पर्धक असे, मनीषा राऊळ (तळवणे), स्वराली लाड (कुडाळ), स्वराली जाधव (कणकवली), समृद्धी राऊळ (मळगाव), धवन्त्री भोगावकर (रानबांबुळी), मनीषा सरकटे, मेधा नाळे (वैभववाडी), चित्रांगी तोरस्कर, विनायक जंगले (वराड), मीना दाभोलकर, रुद्र पवार, चिन्मयी कांदे, रुद्र सर्वेकर, आयुष नाळे, सार्थक धुरी, सुरेश मार्गी, अर्चित सरमळकर, चैतन्या विजापुरे, स्वयंम लवळे, रियांश कासले, ओवी सावंत, संस्कृती पालव, गणेश म्हाडदळकर, खुशी मेस्त्री आणि कृतिका प्रभुदेसाई या गुणवंत स्पर्धकांचीही निवड करण्यात आली आहे. या सर्वांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
संस्थेच्या वतीने सर्व विजेत्यांचे व गुणवंतांचे अभिनंदन करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना जूनमध्ये गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख १,१११ तसेच सर्व गुणवंत स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे डॉट कॉमचे अध्यक्ष संजय बगळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.