कोकण

-माजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट

CD

rat६p१९.jpg-
P26O41842
दिल्लीः माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुष्पगुच्छ देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत.

उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली
माजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी राज्यातील विकासकामांसह विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. ही भेट राज्यातील आगामी वाटचालीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
दिल्ली येथील भेटीप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे उपस्थित होते. माजी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. रामनाथ कोविंद यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या सर्वोच्च पदावर राहून केलेल्या कामाचा आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील अनुभवाचा लाभ महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना मिळावा, हा भेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीनंतर मंत्री सामंत म्हणाले, माजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट हा माझ्यासाठी एक अत्यंत ऊर्जादायी अनुभव होता. त्यांच्या अनुभवातून मिळालेली ऊर्जा आम्हाला जनसेवेच्या कार्यात सदैव प्रेरणा देणारी ठरेल. कोविंद यांनी व्यक्त केलेले विचार आणि दिलेले सल्ले हे राज्यातील उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Britain Politics: पंतप्रधानांवर राजीनाम्याचे सावट! १०० हून अधिक खासदारांचा दबाव; PM सोबत ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय?

Pune Rain Update : उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! सिंहगड, कोथरूडमध्ये रिमझिम सरी, विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

BEST Strike: 'बेस्ट'कामगार थेट विधानभवनावर धडकणार; २५ हजार कामगार रस्त्यावर उतरणार, कृती समितीचा इशारा, मुंबईत हायअलर्ट!

Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

SCROLL FOR NEXT