कोकण

सिंधुदुर्गात इंधन तुटवडा

CD

४१८३५

सिंधुदुर्गात इंधनाचा तुटवडा
वाढत्या मागणीचा परिणाम; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम म्हणून इंधन तुटवडा सुरू झाला आहे. अनेक पेट्रोलपंपांवर इंधन संपल्याने वाहनचालक हैराण आहेत. जिल्ह्यात इंधन टंचाई जाणवू नये म्हणून तातडीने नियोजन करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. सध्या उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने मुंबई-पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यातच चाकरमान्यांचेही जिल्ह्यात आगमन होत आहे. लग्नसराई ऐनभरात असल्यानेही इंधनची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून गेले चार दिवस टंचाई जाणवू लागली आहे. सुरुवातील ही स्थिती ओरोसपासून किनारपट्टी भागापर्यंत होती. आज जिल्हाभर याची झळ दिसली.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नियमित इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत संबंधित ऑईल कंपन्यांच्या डेपो मॅनेजरना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ते नियोजन व समन्वय राखण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज येथील तीनही पेट्रोलियम कंपन्यांच्या इंधन डेपो मॅनेजर्स यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. यास निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या ऑईल कंपन्यांचे डेपो मॅनेजर व विक्रय प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या सूचनेनुसार मिरज येथील पेट्रोलियम इंधन डेपो मॅनेजर्स यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डेपोमध्ये सध्या इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, सिंधुदुर्गात आवश्यक असलेली अतिरिक्त पेट्रोलियम इंधन मागणी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यास तयार असल्याचे डेपो मॅनेजर यांनी सांगितले.

कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावर प्रशासन लक्ष ठेवून असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
- तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

Lionel Messi: निवृत्ती ते विश्वविक्रम, लिओनेल मेस्सीची लक्षवेधक भरारी

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT