कोकण

रत्नागिरीत 25 दुकानावर बुलडोझर

CD

४१८१९
४१८१७

चर्मालय-कोकणनगर मार्ग मोकळा
अनधिकृत २५ दुकानांवर हातोडा; रत्नागिरी पालिकेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : शहराच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेली चर्मालय ते कोकणनगर दरम्यानची बहुचर्चित ‘अतिक्रमण हटाव मोहीम अखेर पालिकेने आजपासून सुरू केली. नगरपालिका प्रशासनाने सकाळपासूनच या भागात धडक कारवाई करत अनधिकृत बांधकामे आणि दुकाने जमीनदोस्त केली. कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी झालेला विरोध झुगारून पालिकेने कारवाई सुरू ठेवली. उद्यादेखील कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
शहरातील चर्मालय ते कोकणनगर भागामध्ये रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण झाले होते. यापूर्वी पालिकेने या अधिक्रमणाचा सर्व्हे करून संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. सुमारे ८० अनधिकृत बांधकामे, दुकाने, गाळे आदींचा यामध्ये समावेश आहे. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने पोलिस संरक्षणात यापूर्वी पालिकेने कारवाई करत ३५ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली होती. त्यानंतर सणासुदीचे दिवस असल्याने पालिकेने कारवाई पुढे ढकलली होती. आज पुन्हा पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत कारवाई केली. अभियंता यतिराज जाधव, आनंद थोरात, विजय कदम, संतोष कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गराटे या अधिकाऱ्यासंह १० कर्मचारी, एक जेसीबी आणि डंपर एवढा लवाजमा घेऊन पालिकेने ही धडक कारवाई केली. या कारवाईला अनेक ठिकाणी विरोध झाला; परंतु तो विरोध झुगारून ही कारवाई करण्यात आली.
पालिकेच्या या कारवाईमुळे येथील वाहतूक कोंडी फुटणार आहे. रस्ता रुंदीकरण, नवीन गटारे आणि पाणीपुरवठा योजनांच्या कामांना आता वेग मिळणार आहे. ​रस्ता अरुंद असल्यामुळे सातत्याने अपघात आणि वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. रस्ता मोकळा झाल्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलेल, अशी आशा नागरिकांना आहे.

कठोर कारवाईचा इशारा
या कारवाईबाबत नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, ज्यांनी अद्याप स्वतःहून अतिक्रमणे काढलेली नाहीत त्यांच्यावर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT