

Rishabh Pant Axar Patel Call Story | Delhi Capitals
Sakal
IPL 2027 Rishabh Pant Trade: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) संपून एक महिनाही झालेला नसताना मोठा ट्रेड झाला. नुकतेच दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांनी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांचे एकमेकांसोबत ट्रेड केले.
२०२५ आयपीएल लिलावात तब्बल २७ कोटी रुपयांना रिषभ पंतला लखनौने (LSG) संघात घेतलेलं. पण त्याच्या नेतृत्वात फारशी चांगली कामगिरी झाली नाही. त्यानंतर रिषभ पंतच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह होते. त्याने लखनौ संघाचे कर्णधारपदही सोडले होते. त्यानंतर अखेर त्याचे लखनौने दिल्लीसोबत (DC) ट्रेड केले असल्याचे सष्ट झाले.