कोकण

राष्ट्र सेवा दल शिबिरांतून मानवता अन् राष्ट्रप्रेमाची शिकवण

CD

kan72.jpg
41931
कणकवली : गोपुरी येथील आश्रमात राष्‍ट्र सेवादलाच्या शिबिरात उपस्थित विद्यार्थी आणि मार्गदर्शक.

राष्ट्र सेवा दल शिबिरांतून मानवता अन् राष्ट्रप्रेमाची शिकवण
संदीप परब : गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : “खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजी लिखित प्रार्थनेतील भावनांची आज समाजाला नितांत गरज आहे. बालवयातच मानवता धर्म आणि राष्ट्रप्रेमाची भावना राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून मुलांच्या मनावर बिंबवली जाते, असे प्रतिपादन संविता आश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी केले.
अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रम, वागदे राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिर झाले. या कार्यक्रमात श्री. परब बोलत होते. शिबिराचे उद्घाटन संदीप परब यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, बाळू मेस्त्री, वात्सल्य मंदिर ओणीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन गुजर, अद्वैत फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार, राजन चव्हाण, संजय सावंत, शहाजी गोंगाणे, चंदन माटुंगे, बिसना थापा आणि श्रावणी कुडाळी उपस्थित होते.
परब पुढे म्हणाले, “युवकांकडे प्रचंड ऊर्जा आहे. राष्ट्र सेवा दलाचे हे शिबिर म्हणजे भारताच्या भावी पिढीतील ऊर्जेला योग्य दिशा देणारे व्यासपीठ आहे. येथे मिळणारे प्रशिक्षण केवळ व्यक्तिमत्त्व विकासापुरते मर्यादित नसून जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य करते. अद्वैत फाऊंडेशनतर्फे सलग नऊ वर्षे राबविण्यात येणारा हा विधायक समाज घडविणारा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, “राष्ट्र सेवा दलाचे शिबिर म्हणजे माणसातील माणूसपण जिवंत करणारी कार्यशाळा आहे. राष्ट्रप्रेमाची शिकवण देतानाच मानवता धर्म जोपासणारी आणि सुजाण भावी पिढी या शिबिरातून घडते. आयुष्यात समाधानी राहण्याचे कसबही येथे शिकायला मिळते.”
डॉ. महेंद्र गुजर म्‍हणाले, “शिस्त, संघटन आणि सेवाभाव ही राष्ट्र सेवा दलाची ओळख आहे. या शिबिरातून मुलांना केवळ ज्ञानच नव्हे, तर जीवन जगण्याची योग्य दृष्टी मिळेल.
या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्हा तसेच मुंबई आणि गोवा येथील शिबिरार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक राजन चव्हाण, सूत्रसंचालन प्रा. मनिषा पाटील यांनी केले तर आभार सरिता पवार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

SCROLL FOR NEXT