कोकण

कोळकेवाडीतील प्रकल्पग्रस्तांचा ११ रोजी मेळावा

CD

कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांचा सोमवारी मेळावा
अलोरे येथे आयोजन; माधव भंडारी करणार मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी जमीन संपादित होऊनही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.११) रोजी अलोरे येथे प्रकल्पग्रस्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी परिसरातील जमीन कोयना प्रकल्पाच्या विद्युतगृह आणि इतर कामांसाठी दोनवेळा संपादित करण्यात आली. जमीन देताना प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, त्यावर अपेक्षित यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर जनजागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अलोरे येथील करमणूक केंद्रात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी माधव भंडारी यांच्यासह राज्य समन्वयक देवराज देशमुख आणि उत्तर कोकण विभाग संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कोट
अलोरे, नागावे, पेढांबे, कोळकेवाडी, कोंडफणसवणे आणि पिंपळी या गावांतील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. मेळावा सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला असून, सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे.

- पांडुरंग शिंदे, कोळकेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबई लोकलमध्ये गुजराती जाहिराती, मराठी भाषिकांचा संताप; VIDEO VIRAL

Thalapathy Vijay: थलापती विजय यांचं 'एक' आश्वासन; राज्यपालांकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील, तमिळनाडूत सत्ताबदल निश्चित! शपथविधी कधी?

RBI New Rules: कर्ज न फेडल्यास बँका घर-जमिनीवर मिळवणार ताबा? समोर आला RBI चा मोठा प्रस्ताव

Tamil Nadu Politics : थलपती विजय विरुद्ध राज्यपाल! तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात प्रकाश आंबेडकरांची उडी; 'या' दोन मोठ्या राजकीय घटनांचा दिला दाखला

Mahur Unseasonal Rain: माहूर तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी; लग्नाचा मंडप क्षणात उडाला, काही ठिकाणी पडल्या गारा!

SCROLL FOR NEXT