Rat७p६.jpg-
26O41951
खेड ः कार्यक्रमात सोलर एनर्जी युनिटचे वाटप करताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक व अन्य.
----
मंडणगडमधील १० शाळांना सोलर युनिटचे वितरण
आमदार म्हात्रे यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना अखंडित वीजपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंडणगड तालुक्यातील १० माध्यमिक शाळांना सोलर एनर्जी युनिटचे वितरण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
कोकण पदवीधर मतदार संघाचे कोकण सहसंयोजक अजय दळवी आणि तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत प्रत्येक शाळेला साडेतीन केव्ही क्षमतेचे सोलर युनिट उपलब्ध करून दिले आहे. ३ मे रोजी खेड येथे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या संचांच्या वितरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. या योजनेचा लाभ तालुक्यातील हुतात्मा तुकाराम बबन भोईटे विद्यामंदिर (कुंबळे), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर (आंबडवे), न्यू इंग्लिश स्कूल (पालवणी), माध्यमिक विद्यामंदिर (उमरोली पंचक्रोशी), के. व्ही. भाटे विद्यामंदिर (वेसवी), मराठी माध्यमिक विद्यामंदिर (लाटवण पंचक्रोशी), लालबहादूर शास्त्री हायस्कूल (दहागाव), न्यू इंग्लिश स्कूल (तुळशी) आणि जर्मन परकार हायस्कूल (बाणकोट) या शाळांना मिळाला आहे. तालुक्यातील शाळांमध्ये पर्यायी ऊर्जेची हक्काची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक यांनी आमदार म्हात्रे यांचे विशेष आभार मानले आहेत.
----
सोलर ठरणार वरदान
पावसाळ्यात अनेकवेळा आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होतो आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते. अशावेळी नियमित वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी सोलर युनिट शाळांना वरदान ठरणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.