कोकण

थेट आंबा विक्रीतून ५ लाखांची उलाढाल

CD

rat७p१३.jpg-
26O41960
पावस ः येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराबाहेरील विक्रेत्यांकडे हापूस खरेदी करताना ग्राहक.

थेट आंबाविक्रीतून पाच लाखांची उलाढाल
पावसमधील दीड महिन्यातील स्थिती; स्वामींच्या मंदिर परिसरात पर्यटकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता थेट बागेतील खात्रीशीर हापूस आंबा उपलब्ध होत आहे. दलालांऐवजी थेट ग्राहकांना आंबा विक्री करण्याच्या या उपक्रमातून गेल्या दीड महिन्यात सुमारे पाच लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यामुळे स्थानिक आंबा उत्पादक आणि विक्रेत्यांना चांगला आर्थिक आधार मिळाला आहे.
निसर्गरम्य पावस परिसरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि भक्त येत असतात. या पर्यटकांना अस्सल रत्नागिरी हापूसची चव चाखता यावी यासाठी मंदिर परिसरातील रस्त्यावर १० ते १२ स्थानिक विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. १५ मार्चपासून या व्यवसायाला सुरवात झाली असून, यामध्ये महिला व पुरुषांचा मोठा सहभाग आहे.
पुणे, मुंबईसारख्या शहरांत मिळणारा आंबा अनेकदा खात्रीशीर नसतो; मात्र, पावसमध्ये थेट बागायतदारांकडून आंबा मिळत असल्याने पर्यटकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. सध्या येथे २५० ते ३०० रुपये डझन या दराने आंब्याची विक्री सुरू आहे. यंदा उत्पादन कमी असले तरी पर्यटकांच्या मागणीमुळे विक्रेत्यांना चांगला दर मिळत आहे. दरम्यान, यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने हा हंगाम पुढील ८ ते १० दिवसांत संपण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
----
कोट
मंदिरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीशीर आणि दर्जेदार हापूस मिळावा या उद्देशाने आम्ही थेट विक्री करत आहोत. स्थानिक बागेतील आंबा असल्याने गुणवत्तेची हमी आम्ही देतो.
- योगेश काजरीकर, विक्रेते
----
कोट
पुण्यासारख्या शहरात हापूसची ओळख पटवणे कठीण जाते; मात्र, पावसमध्ये दर्शनासाठी आलो असता मंदिराबाहेरच खात्रीचा आंबा मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत.
- तन्मय लागू, पर्यटक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT