कोकण

पागेरेवाडीत १२ पासून विविध धार्मिक कार्यक्रम

CD

पागेरेवाडीत १२ पासून
विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ७ ः प्रतिवर्षाप्रमाणे पागेरेवाडी श्री देव ब्राह्मण मंदिराचा १३ वा वर्धापन दिन सोहळा १२ ते १४ मे या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंगळवारी (ता. १२) सायंकाळी ४ वाजता रामकृष्ण भजन मंडळ, नामदेव महाराज (सिंधुदुर्ग) यांचे भजन, ७ वाजता खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार तसेच प्रत्येकी १ हजारची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके व चषक देण्यात येतील. (संपर्क-प्रथमेश परब, ओंकार परब, रवींद्र परब). बुधवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता होम-हवन, अभिषेक, लघुरुद्र आणि नारळ बदलणे, ११ वाजता महाआरती व गऱ्हाणे, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ यांचा फुगडीचा कार्यक्रम, हळदीकुंकू समारंभ, ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८.३० वाजता सातेरी महिला दशावतार, पावशी यांचा नाट्यप्रयोग, गुरुवारी (ता. १४) सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद कार्यक्रम, २ वाजता हळदीकुंकू, ३ वाजता वाडीतील ग्रामस्थांचे भजन, सायंकाळी ४ वाजता डॉ. महादेव परब (कुडाळ) यांचे कीर्तन, ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ वाजता सत्कार समारंभ, ८.३० वाजता नितीन आसयेकर संचलित भूमिका दशावतार नाट्यमंडळ, मळगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. श्री देव ब्राह्मण कला, क्रीडा मंडळ (पागेरेवाडी) आणि श्री देव ब्राह्मण कला वैभव मंडळ (मुंबई) यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandranath Rath: पीए चंद्रनाथ रथ यांना का मारलं? सुवेंदू अधिकारींनी थेट कारणच सांगितलं; भाजप नेत्याचा धक्कादायक खुलासा

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव बाबा झाला... पाळणा हलला... घरी आली लहान परी!

Mumbai Weather: ठाण्यात धुळीचं वादळ, नागरिकांमध्ये भीती; पावसाची शक्यता

NPS Sanchay: रिटायरमेंटची चिंता आता संपली! सरकारची नवी पेन्शन योजना; कोट्यवधी लोकांना होणार मोठा फायदा

डॉ. श्रीराम नेने यांनी अमेरिकेतली नोकरी का सोडली? म्हणाले...'भारतात येण्याचा निर्णय हा…'

SCROLL FOR NEXT