कोकण

संत राऊळ महाविद्यालयात विज्ञानाचे धडे

CD

swt78.jpg
41975
कुडाळ ः सायन्स लॅब समर स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. स्मिता सुरवसे. सोबत डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. एस. के. पवार, डॉ. सुहास पाटील, डॉ. एस. टी. आवटे, प्रा. पीटर रॉड्रीग्ज व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

संत राऊळ महाविद्यालयात विज्ञानाचे धडे
कुडाळातील ‘सायन्स लॅब’ ः गुणवत्ता हमी कक्षाच्या उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाअंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने महाविद्यालयामध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स लॅब समर स्कूल २०२६’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात सुमारे ८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सुहास पाटील यांनी केले. प्रा. सुरवसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. रवींद्र ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या शिबिरामध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या विभागांतर्फे विविध प्रात्यक्षिके, सादरीकरणे व व्याख्याने आयोजित करण्यात आली. दररोज तीन तास चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करत विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात कुडाळ हायस्कूल, कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम तसेच येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
सहकार्यवाह महेंद्र गवस यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समन्वयक  डॉ. सुहास पाटील यांनी पाच दिवसांच्या उपक्रमाचा आढावा सादर केला. कार्यक्रमास गणित विभाग प्रमुख डॉ. एस. के. पवार, प्रमुख अतिथी महेंद्र गवस तसेच अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे उपस्थित होते. डॉ. आर. वाय. ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT