कोकण

तळेकांटेत मुलांच्या सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार

CD

- rat७p१५.jpg-
26O41982
तळेकांटेतील शिबिरात सहभागी विद्यार्थी.

खेळातून उमलली मुलांची कल्पनाशक्ती
तळेकांटेत मनोरंजन शिबिर; गाणी, नाट्याचेही सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः येथील बावनदीजवळील तळेकांटे या डोंगरमाथ्यावर वसलेल्या छोट्याशा गावात दोन दिवस मुलांसाठी अनोखी शाळा भरवण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण विद्यार्थी आणि सुटीत गावी आलेल्या शहरातील मुलांसाठी आयोजित केलेल्या सुटीतील धमाल मनोरंजन शिबिर मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा अनुभव ठरले. गाणी, खेळ, नाट्य आणि विचारांची देवाणघेवाण या वेळी करण्यात आली.
या शिबिराचे उद्‍घाटन सरपंच सुषमा संदीप बने यांनी भिंतीवरील कोऱ्या कागदावर रंगाची रेघ ओढून केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी त्या कागदावर आपापल्या रंगाचा स्पर्श दिला. ‘कोऱ्या कॅनव्हासवर आयुष्याचे रंग भरायचे काम हे शिबिर करेल,’ असा विश्वास प्रशिक्षक राजेंद्र बहाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. या शिबिरात सादर केलेल्या विविध खेळामध्ये सर्वसाधारण टॉवेलच्या वापराच्या खेळातून मुलांनी ५० विविध उपयोग शोधून काढले, ज्यातून त्यांची सकारात्मक विचारशक्ती दिसून आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक राजेंद्र बहाळकर, संजय मोरे आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
-----
पालकांचेही डोळे पाणावले
शिबिराच्या शेवटी मुलांनी आपल्या आई-वडिलांना पत्रे लिहून आपल्या चुकांची कबुली दिली. ही पत्रे पालकांच्या हातात देताना मुलांचे आणि पालकांचेही डोळे पाणावले होते. याप्रसंगी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात सर्जनशीलता आणि निरीक्षणशक्तीचे महत्त्वही मुलांना खेळातून समजावून सांगण्यात आले.

बहुमत डावलून भाजपला आमंत्रण देत शपथही दिलेली, आता विजयसाठी अट का? राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न

Mumbai Pune Expressway Missing Link Video Viral : 180 मीटर उंचीवर क्रेनमध्ये बसून रीलबाजी; 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील कामगारांचा व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा!

Mumbai: मुंबई लोकलमध्ये गुजराती जाहिराती, मराठी भाषिकांचा संताप; VIDEO VIRAL

Thalapathy Vijay: थलापती विजय यांचं 'एक' आश्वासन; राज्यपालांकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील, तमिळनाडूत सत्ताबदल निश्चित! शपथविधी कधी?

RBI New Rules: कर्ज न फेडल्यास बँका घर-जमिनीवर मिळवणार ताबा? समोर आला RBI चा मोठा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT