-rat७p१६.jpg-
P26O41999
पावस ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसमध्ये आगोटची खरेदी करताना नागरिक.
-----------
सुक्या मासळीच्या खरेदीला पसंती
पावसमधील बाजारपेठेत गर्दी ; पावसाळ्यासाठीची तयारी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः पावसाळ्यामध्ये कोणती अडचण येऊ नये याकरिता पावस परिसरामध्ये आगोटची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्यामध्ये पुरेल एवढी वस्तूंची खरेदी सुरू करण्यात आली आहे.
मच्छीमारी सुरू असल्यामुळे मच्छी मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध असते. त्यामुळे त्या खरेदीकडे दररोज नागरिकांचा कल दिसून येतो; परंतु जूनमध्ये मच्छीमारीवर बंदी येत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये मच्छी खाणाऱ्या खवय्यांची फारच अडचण निर्माण होते. यासाठी नागरिक पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुक्या मासळीची खरेदी करतात. उन्हाळ्यामध्ये सुक्या मासळीचा दर कमी असला तरी पावसाळ्यामध्ये त्याचा दर वाढतो. कारण, मच्छीमारी बंद असल्यामुळे ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्याला दर चांगला मिळतो. यासाठी कमी दरामध्ये खरेदी करता यावी याकरिता अनेक आठवडा बाजारामध्ये सुक्या मासळीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
------
सुकी मासळीचे दर (किलोमध्ये)
मासळी* दर
बोंबील* ५०० ते ६००
करदी* ५०० ते ८००
कोलीम* २५० ते ३५०
म्हाकुळ* ५५०
लेपा* ५५०
चेवनी* ३५०
तेडली* ३५०
बळे* ३५०
वागती* ४००
तोडे* १७००
सौंदळे* ४५०
दोडी* ५५०
---------
कोट
गेले अनेक वर्ष आम्ही आमचा व्यवसाय करत असून, अलिबाग, भाईंदर या ठिकाणावरून ग्राहकांना लागणाऱ्या मागणीनुसार वस्तू खरेदी करत असून, त्याची विक्री प्रत्येक आठवडा बाजारामध्ये करतो. पावसाळ्यामध्ये हा व्यवसाय बंद असतो अन्यथा उरलेल्या सर्व दिवशी ही आमची सर्व वस्तूंची विक्री करत असतो; परंतु पावसाळ्यापूर्वी याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते.
-विवेक चव्हाण, व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.