कोकण

रत्नागिरी-''सकाळ'' रत्नागिरी कार्यालयाचा आज वर्धापनदिन

CD

‘सकाळ’ रत्नागिरी कार्यालयाचा
आज ३७ वा वर्धापन दिन सोहळा
‘सागरमंथन’ विशेष पुरवणी ः सायंकाळी स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः उदय भविष्यपत्राचा असे बिरूद मिरवत दै. ‘सकाळ’च्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. ८) आयोजित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिर्के प्लाझामधील ‘सकाळ’च्या कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वाचक, हितचिंतकांचा स्नेहमेळावा होईल.
रत्नागिरी जिल्ह्यात ‘सकाळ’ला ३७ वर्षे झाली. विश्‍वासार्हता जपत ‘सकाळ’ने विविध प्रश्‍नांवर आवाज उठवला. संयमी बातम्यांमुळे वाचकांना आपलेसे केले. वाहतूक कोंडी, पूरसमस्या, पाणीटंचाई, मच्छीमारी, आंबा बागायतदारांचे प्रश्‍न, राजकारण यांसह विविध विषयांवर ‘सकाळ’ने ठाम भूमिका घेतली. बातम्या, लेखांमधून केलेले विचारमंथन हे ‘सकाळ’चे वैशिष्ट्य आहे. कोणतीही घटना घडली की, केवळ बातमी न करता त्या विषयावर विश्लेषण केले जाते. एखादा विषय विविध अंगांनी आकर्षक मांडणीतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’ करत आहे. समाजातील सर्व वयोगटांतील वाचकांना हवाहवासा वाटणारा मजकूर देऊन ‘सकाळ’ने वाचनाची भूक भागवली आहे.
रत्नागिरी कार्यालयाच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘सागरमंथन’ ही विशेष जाहिरात पुरस्कृत पुरवणी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या पुरवणीत कोकण किनाऱ्याचा प्रश्न, सामाजिक, कोळंबीपालन, मत्स्य संवर्धनातील अडथळे, कृत्रिम बुद्धिमत्ता, मत्स्य व्यवसायाला पूरक, मानवनिर्मित सागरी प्रदूषणाचे आव्हान, कांदळवन ः अद्‍भुत दुनिया पाहू दृष्टी बदलून, बदलत्या वातावरणाचे मत्स्य व्यवसायापुढे आव्हान, नाखवा सॅटेलाईटद्वारे शोधतो माशांचे थवे, समुद्री संपत्ती दुर्मीळ जलचरही संकटात, कातळशिल्प आणि सागर सहसंबंध, समुद्री पक्षी, कोकणचं सीफूड अशा विविध विषयांवर तज्ज्ञ अभ्यासकांचे लेख प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ‘सागरमंथन’ ही संग्राह्य पुरवणी मुख्य अंकासोबत शुक्रवारी प्रकाशित करत आहोत. ‘सकाळ’च्या कार्यालयात होणाऱ्या स्नेहमेळाव्याला अगत्याने यावे, असे आवाहन ''सकाळ'' पेपर्स प्रा.लि. तर्फे करण्यात आले.

विविध उपक्रमांतून
समाजाशी नाळ
समाजात बदल घडवण्यासाठी स्त्रीप्रतिष्ठा अभियान, युवकांसाठी यिनसारखे व्यासपीठ तर बालकांसाठी एनआयईसारखा माहितीपूर्ण असा अंक आठवड्याला प्रसिद्ध केला जात आहे. ''सकाळ'' रिलीफ फंडाद्वारे दुष्काळग्रस्तांसाठी मदत, तनिष्का व मधुरांगणतर्फे महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ अशा विविध उपक्रमांतून समाजाशी नाळ जोडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT