कोकण

भविष्यात सहकार क्षेत्राला अधिक महत्त्व प्राप्त होणार

CD

42204

भविष्यात सहकार क्षेत्राला
अधिक महत्त्व प्राप्त होणार

दळवी : ‘विद्यासागर’ पतसंस्थेचे उद्‍घाटन

कुडाळ, ता. ७ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानसिकता आणि विश्वास सहकार क्षेत्रावर आहे. भविष्यात सहकार क्षेत्राला महत्व प्राप्त  होणार आहे. यासाठी संस्था बळकट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे केले.
विद्यासागर महाविद्यालयीन पगारदार संवर्ग सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे उद्‍घाटन माठेवाडा  कुडाळ येथे श्री. दळवी यांच्या हस्ते क.म.शि .प्र मंडळ उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी जिल्हा उपनिबंधक सुनील मरभळ, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, पतसंस्था संस्थापक राजाराम गव्हाणकर, पतसंस्था मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष विधाता सावंत, संचालक अनंत लोखंडे, गोविंद काजरेकर, मीनल माजरेकर, संजय पाटील, कमलाकर बांदेकर, डॉ. राहुल गव्हाणकर आदी उपस्थित होते.
श्री. दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात लोकांचा विश्वास आहे. याठिकाणी सहकार रुजविण्यासाठी सहकारमहर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यात सहकार क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार आहे. या संस्थेचे राजाराम गव्हाणकर यांचे सहकार क्षेत्रातील कार्य खूप चांगले आहे. त्यांना सर्वाची साथ मिळणार आहे. जिल्ह्यात सहकार वाढविण्याबरोबरच आपली  संस्था बळकट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. अध्यक्ष विधाता सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राहुल गव्हाणकर यांनी सूत्रसंचलन केले. विधाता सावंत आणि राजाराम गव्हाणकर यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : १९ वर्षीय समीक्षाने तयार केलेली जर्सी घालून राजस्थान रॉयल्स खेळणार! जाणून घ्या त्या मागची स्पेशल स्टोरी

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडिया कायदा येणार?

RR vs GT Live : यशस्वी जैस्वाल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार! रियान पराग संघाबाहेर का? व्हॅपिंग प्रकरण भोवले की आणखी काही?

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT