Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Ladki Bahin Yojana : या गैरप्रकारामुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे १६५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
Ladki Bahin Scheme scam exposes

Ladki Bahin Scheme scam exposes

esakal

Updated on

Massive Irregularities in Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे. राज्य सरकारने विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात कबूल केले की, तब्बल १२,४१५ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतला. अधिक धक्कादायक बाब म्हणजे केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत पुरुषांच्या बँक खात्यातही पैसे जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे १६५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com