42235
वैभववाडी : येथील शांती नजीकच्या महामार्गाची पाहणी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केली. यावेळी सभापती सिध्देश रावराणे, कार्यकारी अभियंता वृषाली पाटील, प्रमोद रावराणे, मंगेश लोके आदी उपस्थित होते.
वैभववाडीत महामार्गाचे काम संथगतीने
पदाधिकारी आक्रमक : अधिकारी धारेवार, २५ मेपूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ : तळेरे-कोल्हापूर महामार्गाच्या वैभववाडीत झालेल्या कामावरून येथील पदाधिकारी आज आक्रमक झाले. चालढकलपणा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांना संतप्त पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी २५ मे पूर्वी शहरातील कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
तळेरे-कोल्हापुर महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम गेले दीड दोन वर्षापासुन सुरू आहे. या महामार्गाचे काम करीत असताना या महामार्गाला असलेले जोडरस्ते ठेकेदाराने वाहतुकीस अयोग्य केले आहेत. वैभववाडी तालुक्यातील करूळ, एडगाव, कोकिसरे, नाधवडे या चारही गावांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वैभववाडी शहरातील गटार, फुटपाथ, स्ट्रीटलाईट असे अनेक विषयासंदर्भात आज सभापती सिध्देश रावराणे यांनी महामार्ग प्रधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदाराला वैभववाडीत बोलविले होते. त्यानुसार महामार्ग प्रधिकरणच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील, शाखा अभियंता पवन पाटील आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित राहीले. या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती दाखविण्यासाठी सभापती सिध्देश रावराणे, नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, प्रमोद रावराणे, मंगेश लोके, मुख्याधिकारी प्रतिक थोरात, रणजित तावडे, आशिष रावराणे आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी शांतीनदीच्या पुलापासुन ते संभाजी चौकांपर्यतच्या महामार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. रावराणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वैभववाडी शहरातील फुटपाथ, उखडुन टाकलेली स्ट्रीट लाईट, चार गावातील जोड रस्ते या संदर्भात आपणास वेळोवेळी माहीती दिली. परंतु महामार्ग प्रधिकरणकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. चारही गावातील जोडरस्ते तुमच्यामुळे बंद झाले आहेत. ते सुरू कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठेकेदार ही कामे अंदाजपत्रकात नाही असे सांगुन टोलवाटोलवी करतो. जर अंदाजपत्रकात काम नव्हते तर जुने रस्ते का उखडले गेले. एकतर या रस्त्यांचे भुसंपादन झालेले नाही, भुसंपादनाचा एकही रूपया जमीनमालकांना दिलेला नाही. तरीदेखील वैभववाडीतील जनतेने विकासकाम म्हणुन चांगुलपणा दाखविला. मात्र, आता त्याच जनतेला ठेंगा दाखवताय का? हे अजिबात खपवुन घेणार नाही, असा इशारा दिला.
चौकट
चारही गावातील जोडरस्त्यांची कामे पूर्ण करा
शहरातील सर्व कामे तातडीने पूर्ण कराच परंतु त्यासोबत उर्वरित चारही गावातील जोडरस्त्यांची कामे पूर्ण करा असे श्री. रावराणे यांनी स्पष्ट केले. सभापती रावराणे यांनी देखील अधिकाऱ्यांना खडसावले. यावेळी कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी जोडरस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करून ती कामे पूर्ण करण्यात येतील. याशिवाय शहरातील स्ट्रीट लाईट, फुटपाथ, गटारासंदर्भातील कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. जर वेळेत कामे झाली नाही तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देखील श्री. रावराणे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.