ए. जी. हायस्कूलचे दहावी परीक्षेत यश
दापोली : दापोली शिक्षणसंस्था संचलित ए. जी. हायस्कूलने यंदाच्या दहावी परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत दापोली तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी रिद्धीमा चव्हाण हिने तब्बल १०० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा विद्यालयातून एकूण २६२ विद्यार्थी एसएससी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ९७.३२ टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रिद्धीमा चव्हाण हिने १०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. नील फडके याने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय, क्रांती केळस्कर हिने ९५.४० टक्के गुणांसह तृतीय, पल्लवी भुवड हिने ९४.८० टक्के गुणांसह चौथा तर सई शिगवण हिने ९४.६० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, कार्यवाह डॉ. विनोद जोशी, संचालक मंडळ, शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र कालेकर, सदस्य श्रीकांत निजामपूरकर, स्मिता सुर्वे, मुख्याध्यापक कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेठकर, मगदूम, यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.