खेड तालुक्याचा निकाल ९७.८० टक्के
ज्ञानदीपचे तिघे अव्वल; ४१ शाळांचा १०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.८० टक्के लागला आहे. तालुक्यातून १९६१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष योग्यतेमध्ये ४७३ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ६९४, द्वितीय श्रेणी ५९५, तृतीय श्रेणीत १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील ४१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्याचबरोबर तालुक्यातून होडखाड शाळेतून २ विद्यार्थी, शिंगरी हायस्कूलमधून २ विद्यार्थी, कुरवळ जावळी या शाळेतून ५ विद्यार्थी, साखर विद्यालय येथून ५ विद्यार्थी तसेच तिसंगी हायस्कूलमधून ८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. याही शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसलेल्या शाळा अशा एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड १७८ विद्यार्थी, नवभारत हायस्कूल भरणे १६४, इंग्लिश मीडियम स्कूल १०९, कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे १०२, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल ९२ विद्यार्थी असे या परीक्षेसाठी बसले होते.
---
अनुराग वाघमोडे राज्यात पहिला
अनुराग वाघमोडे याने १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तर वृषभ देवघरकर ९९.६० टक्के गुण मिळवून राज्यात तृतीय तर दिशा मोहिते ९९.४० टक्के गुण मिळवून राज्यात चौथी आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.