कोकण

तळेरे-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत

CD

swt९५.jpg मध्ये फोटो आहे.
कोकिसरे ः येथील रेल्वे फाटकानजीक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


तळेरे-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत

कोकिसरे महामार्ग चिखलमय; शेकडो वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ : तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील कोकिसरे रेल्वेफाटकानजीक सुरू असलेला रस्ता चिखलमय झाल्यामुळे तेथे शेकडो वाहने शुक्रवारी (ता. ८) रात्री अडकली. पोलिसांनी लहान वाहने नापणे रेल्वे स्थानक, बोर्चीमार्गे वळविली, तर अवजड वाहने जेसीबीचा वापर करून मार्गस्थ करण्यात आली.
तळेरे-कोल्हापूर महामार्गावर कोकिसरे रेल्वेफाटकानजीकच्या भुयारी मार्गाला जोडरस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याकरिता मातीचा भराव टाकण्यात आला आहे. याशिवाय कोकिसरे रेल्वेफाटकानजीक चढ कमी करण्यासाठी त्याचे उत्खनन करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. ७) तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हा सर्व परिसर चिखलमय झाला. अनेक वाहने घसरत ५० मीटरपर्यंत गेली. शुक्रवारी देखील वैभववाडीत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कोकिसरे रेल्वे फाटकानजीक चिखलमय स्थिती निर्माण झाली. त्यामुळे दुतर्फा येणारी वाहने चिखलात रुतण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक थांबवावी लागली. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. एस. बाईत, पोलिस कर्मचारी हरेष जायभाय, गणेश भोवड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन्ही बाजूला उभी असलेली लहान वाहने नापणे रेल्वेस्थानक, बोर्चीवाडी मार्गे वैभववाडीकडे वळविण्यात आली. त्यानंतर अवजड वाहने जेसीबीच्या सहाय्याने मार्गस्थ करण्यात आली. तासाभरानंतर या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: तिढा सुटला! विजय थलापती उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; कसा असेल फॉर्म्युला?

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुरकी नगरपालिकेतील 'सुन्हेरा मार्ग चौक'चे नाव बदलून 'शहीद चौक' करण्यास मंजुरी दिली

MHADA: म्हाडाच्या १५६ लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपणार, २५ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती होणार; घरांच्या किमतीतही १५ लाखांनी घट

RR vs GT Live : 4,wd,0,2nb,5wd,wd,wd,0,1,2,1! जोफ्रा आर्चरने षटक पूर्ण करण्यासाठी टाकले ११ चेंडू; शेवटच्या चेंडूवर वादग्रस्त घटना...

Sachin Tendulkar: ''हेल्मेट कुठंय?'' पुण्यात अचानक सचिन तेंडुलकरची गाडी थांबली, तरुणाची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT