कोकण

शिंदे शिवसेनेतर्फे बांद्यात उद्या महाआरोग्य मेळावा

CD

शिंदे शिवसेनेतर्फे बांद्यात
उद्या महाआरोग्य मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः माहिरा फाउंडेशन आणि शिंदे शिवसेनेचे रियाज खान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ११) बांदा येथे भव्य ‘महाआरोग्य मेळावा’ आयोजित केला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा पार पडणार असून विविध आजारांवरील तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मेळाव्यात त्ररोग तज्ज्ञांकडून मोफत नेत्रतपासणी तसेच नेत्रपटल तपासणी केली जाणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत नेत्रपटल उपचार व शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. याशिवाय ५० टक्के सवलतीच्या दरात चष्मे देण्यात येणार आहेत. फेको पद्धतीची मोतिबिंदू शस्त्रक्रिया केवळ सहा हजार रुपयांत करण्यात येणार आहे. मूत्ररोग विभागात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मुतखडा, प्रोस्टेट आणि किडनी स्टोनवरील मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच मधुमेह व रक्तदाब रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येईल. मेळाव्यात सोनोग्राफी, २-डी इको, ईसीजी, एक्स-रे व रक्त तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. या महाआरोग्य मेळाव्यात डॉ. संजय केसरे (एमबीबीएस, सोनोलॉजिस्ट), डॉ. रोहित शिरोडकर (एमएस, एमसीएच, व्हिट्रिओ रेटिना सर्जन), डॉ. जयश्री केसरे (एमबीबीएस, नेत्रचिकित्सक) हे तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. रुग्णांनी येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, जुने वैद्यकीय रिपोर्ट्स आणि सुरू असलेली औषधे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी बांदेश्वर डायग्नोस्टिक पॉलिक्लिनिक आणि आय केअर सेंटर, सायरा कॉम्प्लेक्स, बांदेश्वर मंदिरानजीक, बाजारपेठ, बांदा येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : १९ वर्षीय समीक्षाने तयार केलेली जर्सी घालून राजस्थान रॉयल्स खेळणार! जाणून घ्या त्या मागची स्पेशल स्टोरी

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडिया कायदा येणार?

RR vs GT Live : यशस्वी जैस्वाल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार! रियान पराग संघाबाहेर का? व्हॅपिंग प्रकरण भोवले की आणखी काही?

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT