-rat९p५५.jpg-
26O42442
राजापूर ः ओगलेवाडी येथे घराच्य छतावरील उडालेले पत्रे.
-rat९p५६.jpg-
26O42443
राजापूर ः कोंड्ये-पांगरे रस्त्यामध्ये पडलेले झाड.
----
राजापूर तालुक्याला वादळी पावसाचा तडाका
पांगरे रस्त्यावर झाड पडले; ओगलेवाडीत घरावरील पत्रे उडाले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः तालुक्यात सायंकाळी जोरदारपणे हजेरी लावणाऱ्या पावसाने सलग आज दुसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश आणि दुपारी वाढता उष्मा अशी स्थिती असताना सायंकाळी चारच्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट करत अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस पडला. त्यामध्ये कोंड्ये-पांगरे रस्त्यामध्ये झाड मोडून पडल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामध्ये शहरातील ओगलेवाडी येथील काही घरांच्या छतावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे.
सातत्याने हवेतील वाढणाऱ्या उष्म्याने सर्वसामान्य चांगले हैराण झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी जोरदारपणे अवकाळी पाऊस पडला असला तरी, आज दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश होता; मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांसह विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली.
हापसू आंबा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असताना परिपक्व झालेला हापूस आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्याची लगबग सुरू आहे. अशातच आज पडलेल्या पावसाचा आंबापिकाला फटका बसणार आहे. पावसामध्ये कोंड्ये-पांगरे रस्त्यामध्ये झाड मोडून पडल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील ओगलेवाडी येथील काही घरांच्या छप्परांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे; मात्र, नुकसानीचा निश्चितच आकडा समजू शकलेला नाही.
---
लग्नाच्या उत्साहावर पाणी
सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू असून, यजमानांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्यामध्ये आज लग्नाचे जास्त मुहूर्त असल्याने दिवसभर लग्नाचा धामधूम सुरू होता. अशातच अचानक पडलेल्या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.
---
२० विजेचे खांब पडले
केळवली, निखरेवाडी, पन्हाळे-माळवाडी, कोंडये या भागामध्ये झालेल्या वादळीवाऱ्यामध्ये १५ ते २० विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, पडलेले खांब व तारा सोडवून इतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.
छ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.