-rat९p४८.jpg-
P26O42435
रत्नागिरी ः जीवन प्राधिकरणच्या नाचणे येथील कंपाउंडमधील पाईपांना लागलेली आग.
-rat९p४९.jpg-
26O42436
पाणी आणि फोममिश्रित फवाऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
----
जीवन प्राधिकरणाचे पाईप आगीत खाक
दुसऱ्यांदा घटना ; अग्निशमन दलाकडून नियंत्रण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : शहराजवळील नाचणे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंपाउंडमध्ये ठेवलेले पाईप आगीत खाक झाल्या. पालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परता दाखवत ही आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे पाणी आणि फोम एकत्रित करून ही आग आटोक्यात आणली. पालिकेने अलीकडे हा प्रयोग सुरू केला आहे. केमिकलमुळे आग लागल्यास त्याचा वापर केला जातो. या पाईपना आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ही आग लावली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नाचणे येथे कार्यालय आहे. त्याच्या कार्यालयाच्या आवारात पाणीयोजनांसाठी वापरले जाणारे पाईप ठेवण्यात आले आहेत. प्राधिकरणाचा हा मोठा परिसर असला तरी त्याला सुरक्षा नाही आणि स्वच्छता नाही. मोठ्या प्रमाणात रान उगवलेले असते. त्यामुळे गेल्यावेळी देखील अशाच प्रकारे गवताला आग लागून लाखो रुपयाच्या नवीन पाईप जळून खाक झाल्या होत्या. आज दुपारीदेखील उर्वरित पाईपना पुन्हा आग लागली. एकदम पंधरा ते वीस पाईपना आग लागल्याने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ उसळत होते. याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे, गणेश भारती तसेच नाचणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वर्षा नाईक आदी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---
जागा पडीक पण बंदिस्त नाही
आगीबाबत पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु बहुतेक पाईप जळून खाक झाल्या होत्या. ही जागा पडीक असल्याने आणि बंदिस्त नसल्याने तेथे कचरा टाकला जातो. त्यातूनच एखाद्या ठिणगीमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे; मात्र यात पाईपचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.