42494
सावंतवाडी : नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक ‘मिलाग्रीस कॅथेड्रल’चा उद्घाटन व आशीर्वाद सोहळा शनिवारी झाला.
‘मिलाग्रीस कॅथेड्रल’मुळे मानाचा तुरा
ॲग्नेलो पिन्हेरो : सावंतवाडी येथे थाटात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ : मिलाग्रीस कॅथेड्रल (महामंदिर) मुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या भव्य वास्तूच्या उभारणीत सर्व समाजातील नागरिकांचा आणि भाविकांचा मोलाचा सहभाग लाभला, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप ॲग्नेलो पिन्हेरो यांनी आज येथे काढले.
सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ मध्ये उदयास आला. या धर्मप्रांतातील सावंतवाडी ‘मिलाग्रीस महामंदिराचे’ नूतनीकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते. या ऐतिहासिक आणि पुनर्रचित मिलाग्रीस कॅथेड्रलचे उद्घाटन व आशीर्वाद सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. सोहळ्यासाठी अनेक उच्चपदस्थ कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू उपस्थित होते. हा ऐतिहासिक क्षण सुमारे पाच हजार भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. मुंबईचे आर्चबिशप एमिरेट्स कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्य मिसा अर्पण सोहळ्याचे अध्यक्षपद गोवा आणि दमणचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेराव यांनी भूषविले. याप्रसंगी मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, पुण्याचे बिशप सायमन अल्मेडा, अमरावतीचे बिशप मॅल्कम सिक्वेरा, बेळगावचे बिशप डेरिक, गोव्याचे बिशप सिमाव, नाशिकचे बिशप लुर्ड्स आणि सिंधुदुर्गचे पहिले बिशप एमिरेट्स ऑल्विन बर्रेटो यांच्यासह सलेशियन, जेझुईट, कॅप्यूचिन आणि फ्रान्सालियन या धार्मिक संस्थांचे प्रांतीय प्रमुख उपस्थित होते.
०००००००००
पान ७ साठी....
‘मिलाग्रीस कॅथेड्रल’च्या
सोहळ्यानिमित्त मिरवणूक
सावंतवाडी, ता. ९ : मिलाग्रीस कॅथेड्रल उद्घाटन सोहळ्यानिमित्त सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नऊला नूतनीकरण केलेल्या कॅथेड्रलचा मुख्य उद्घाटन सोहळा झाला. दुपारी बारापासून सत्कार समारंभ झाला.
सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप ॲग्नेलो पिन्हेरो म्हणाले, ‘‘या सोहळ्यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या भव्य वास्तूच्या उभारणीत सर्व समाजातील नागरिकांचा आणि भाविकांचा मोलाचा सहभाग लाभला आहे.
यामध्ये धार्मिक क्षेत्रातील विविध व्यक्तींसह माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आदी उपस्थित होते.
माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरपंचायत सभापती सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, देवा टेमकर, नगरसेविका सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सुनीता पेडणेकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, तानाजी वाडकर, कॅथेड्रलचे आर्किटेक्ट ब्रायन सोरेस, इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर मिलिंद आदींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी फादर मिलेट डिसोजा, विकर जनरल रेव्ह. फादर अँद्रू डिमेलो, सहाय्यक धर्मगुरू फादर अमृत, सल्लागार रेव्ह. फादर फेलिक्स लोबो, प्राचार्य रेव्ह. फादर रिचर्ड, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, सावंतवाडी कॅथोलिक असोसिएशनचे अध्यक्ष जॉय डान्टस, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, जॉनी फेराव, ऑगस्टीन फर्नांडिस, जो रॉड्रिक्स, डुमिंग डिसोजा, ग्रेगरी डान्टस, जॉन फर्नांडिस, स्टीवन डिसिल्वा, रेमी आल्मेडा, डुमिंग आल्मेडा, लॉरेन्स डिसोजा, रॉबर्ट आल्मेडा, डुमिंग डिसोजा, नेल्सन मिनेजिस, अलेक्स डिसिल्व्हा आदी उपस्थित होते.
०००००००००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.