कोकण

मिटले वाद; पुन्हा जुळली नाती

CD

42538

मिटले वाद; पुन्हा जुळली नाती

जिल्ह्यातील लोकअदालत; २२५ प्रकरणे निकाली, ३ कोटी ६३ लाखांची वसुली

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण ३ कोटी ६३ लाख १० हजार ५३५.५ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समझोता होऊन निकाल झाल्याने त्यांच्यातील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तडजोडीच्या निकालांविरुद्ध अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
९ मे २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे (अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिरण) यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी सर्व तालुका न्यायालयात एकूण सात पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमण्यात आले होते. पॅनेल क्र.१ मध्ये श्रीमती व्ही. एस. देशमुख, जिल्हा न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग व विधीज्ञ निकिता हरकुळकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.२ मध्ये आर. व्ही. नडगदल्ली, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग व विधीज्ञ भूषण कदम यांनी काम पाहिले. संपूर्णा गुंडेवाडी (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) उपस्थित होत्या. या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमधील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दिवाणी दावे, फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात भरपाई, वीज देयक प्रकरणे, कौटुंबिक वाद तसेच विविध वादपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. यात पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांतील न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २२५ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. या प्रकरणांमध्ये एकूण ३ कोटी ६३ लाख १० हजार ५३५.५ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली.
................
सामोपचाराने दाम्पत्याचा पुन्हा संसार सुरू
लोकअदालतीमध्ये एका दाम्पत्यामधील कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटविण्यात यश आले. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक संवाद घडवून आणण्यात आला. प्रस्तुत प्रकरणामध्ये ॲड. एस. के. तायशेटे व ॲड. निखिल गावडे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT