कोकण

अवकाळी पावसाने बागायतदार संकटात

CD

42550


अवकाळी पावसाने बागायतदार संकटात

मिलिंद सावंत ः शासनाने विशेष मदत जाहीर करावी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केली आहे.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंबा व काजू हंगाम अंतिम टप्प्यात असताना अचानक झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. अनेक ठिकाणी आंब्याची फळे झाडावरून खाली पडली असून काजू बियांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. बागायतींची हानी वाढली आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची तत्काळ पाहणी करून पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे आवश्यक असून शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT