कोकण

प्रमिला पाटील हिची रेल्वे पोलीस दलात निवड

CD

प्रमिला पाटील हिची
रेल्वे पोलीस दलात निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. प्रमिला पांडुरंग पाटील हिची मुंबई रेल्वे पोलीस दलात निवड झाली आहे. तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या हस्ते तिचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमिलाने २०१३ मध्ये डीबीजे महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि २०१५ मध्ये तिने बी. कॉम. पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन काळात ती जिमखाना विभागातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखली जात असे. तिने क्रॉस कंट्री, रायगड ट्रेकिंग आणि हाफ मॅरेथॉन या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. आंध्रप्रदेश येथे झालेल्या आंतरविद्यापीठीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. खडतर मानल्या जाणाऱ्या ''कात्रज ते सिंहगड'' (K2S) ट्रेकिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. रेल्वे पोलीस भरतीसाठी प्रमिलाने कोल्हापूर येथील लक्ष्य करिअर अकॅडमीत पाच महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली, ‘‘माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा आणि यशाचा पाया डीबीजे महाविद्यालयाने भक्कमपणे रचला. संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथवर पोहोचू शकले.’’
तिच्या गौरवावेळी वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना प्रमुख डॉ. सम्राट माने, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना प्रमुख प्रा. विलास जोशी आणि क्रीडा शिक्षक प्रा. जीवनराज कांबळे उपस्थित होते. प्रमिलाच्या या यशाचे चिपळूण परिसरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT