कोकण

दाभोळे परिसरात दाट धुक्याची दुलई

CD

rat10p6.jpg-
42596
साखरपा : दाभोळे परिसरात पडलेले दाट धुके.

दाभोळे परिसरात दाट धुक्याची दुलई
मे महिन्यात आल्हाददायक वातावरण ; नागरिकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १० ः गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साखरपा आणि दाभोळे परिसरातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला असतानाच, रविवारी (ता. १०) सकाळी या परिसरात दाट धुके पाहायला मिळाले. मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात पडलेल्या या धुक्याने निसर्गाचे वेगळेच रूप समोर आले आहे.
शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यासह साखरपा आणि दाभोळे परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन तापमानात मोठी घट झाली आहे. सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी, तर सकाळी धुक्याची चादर यामुळे जणू काही पावसाळा किंवा हिवाळा सुरू असल्याचे भासत आहे. शनिवारी आणि रविवारी सकाळी दाभोळे परिसरात इतके दाट धुके होते की, काही अंतरावरील रस्ते आणि परिसरही अस्पष्ट दिसत होता. मे महिन्यात एरवी उन्हाचे चटके सहन करावे लागतात, मात्र यंदा पडलेल्या या धुक्यामुळे वातावरणात एक प्रकारचा गारवा आणि आल्हाददायकपणा निर्माण झाला आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत हे चित्र दुर्मिळ असल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला, तरी कडक उन्हाच्या दिवसात अचानक झालेल्या या बदलाचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, धुक्यामुळे सकाळी वाहनचालकांनाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT