Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

IMD Rain Forecast Maharashtra : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रासह २१ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोवा व कारवार परिसरात ढगांची दाटी वाढली असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra 21 District Rain Alert mumbai

Maharashtra 21 District Rain Alert mumbai

esakal

Updated on

Heavy Rain Alert Maharashtra : महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकण आणि राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुंबईत सकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com