कोकण

गिर्येत उद्या सात फूट उंच बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना

CD

42629


गिर्येत उद्या सात फूट उंच बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना

विजय गिरकर : धम्ममेळाव्यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, गिर्ये बौद्धजन विकास मंडळ, महिला सेवा संघ विजयदुर्ग विभाग आणि पंचशील महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.१२) पडेल येथे सकाळी १०.३० वाजता धम्ममेळावा घेण्यात येणार आहे. तर त्याच दिवशी सकाळी ८.३० वाजता गिर्ये येथील बुध्दविहारामध्ये सुमारे ७ फुटी उंचीच्या बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय तथा भाई गिरकर यांनी येथे माध्यमांना दिली.
या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्री. गिरकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी अनिल पुरळकर, दिलीप वाडेकर, दीपक गिरकर, उत्तम कांबळे, सचिन गिरकर आदी उपस्थित होते. श्री. गिरकर म्हणाले, धम्ममेळाव्याला डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे नातू आणि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ८.३० वाजता विविध ६ भंतेजी यांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या संयुक्त जंयती महोत्सवानिमित्त गिर्ये बुध्दविहारामध्ये सुमारे ७ फुटी उंचीच्या बैठ्या बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गिर्ये बुध्दविहाराच्या ५१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानिमित्त डॉ. भीमराव आंबेडकर, पालकमंत्री नीतेश राणे यांचीही उपस्थिती राहणार आहे. गिर्येत सकाळी ९ वाजता गिर्ये ग्रामपंचायतीसमोर मराठी वाद्यवृंद कार्यक्रम, बुध्द पूजापाठ, १० वाजता मुलांच्या विविध स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा, सकाळी ९ वाजता क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. पडेल येथे आयोजित धम्ममेळाव्याला तालुक्यासह जिल्हाभरातील मंडळी उपस्थित राहणार असल्याचे श्री. गिरकर यांनी सांगितले.
---------
आज मिरवणूक
गिर्ये बुध्द विहाराच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या बुध्द मूर्तीची सोमवारी (ता.११) सायंकाळी ५ वाजता गिर्ये कँटीन ते बुध्दविहार अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचदिवशी सकाळी १० वाजता बुध्द पूजापाठ, ११ वाजता महिलांसाठी हळीकुंकू, दुपारी १२.३० वाजता संपूर्ण गावाला भोजन देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT