42630
‘अन्नपूर्णा’ची साठवण क्षमता वाढणार
गाळ उपशाला प्रारंभ; दहिबावमध्ये ‘नाम’चे सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः येथील देवगड जामसंडे शहराला पाणी पुरवठा होणार्या तालुक्यातील दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ उपसा करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. नदीपात्रातील पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी ''नाम फाउंडेशन'' यांच्या सहकार्याने याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत पुढील काही दिवस गढूळ पाणी पुरवठा होऊ शकतो. यासाठी शहरातील नळधारकांनी पाणी गाळून व उकळून पिण्याचा सल्ला नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत, दहिबाव ग्रामपंचायत, नारिंग्रे ग्रामपंचायत, मिठबाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दहिबाव अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ उपसा करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, शरद ठुकरुल, बाळ खडपे, योगेश चांदोस्कर, दहिबाव सरपंच सचिन नाचणकर, नारिंग्रे सरपंच महेश राणे, शहर अध्यक्ष वैभव करगुंटकर, बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे, नगरपंचायत कर अधिकारी गायकवाड, पाणीपुरवठा अधिकारी चारुदत्त पारकर, कुंदन घाडी, नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील, पाणी पुरवठा फिटर शमशुद्दीन हवालदार, दहिबाव, नारिंगे ग्रामस्थ व पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते. गाळ उपसा करण्याने योजनेच्या उद्भवाच्या ठिकाणच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.