कोकण

द बिग स्टोरीसाठी कोट व फोटो

CD

42631
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराई.
---------------------------
42632
प्रवीण सातोसकर

कोट
देवराई ही केवळ झाडांची गर्दी नसून आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा अमूल्य वारसा आहे. पूर्वीपासून गावकऱ्यांनी धार्मिक भावना आणि परंपरेतून या वनक्षेत्रांचे जतन केले, त्यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, पक्षी आणि वन्यजीव आजही सुरक्षित राहिले आहेत. देवराई जैवविविधतेचे नैसर्गिक आश्रयस्थान म्हणून कार्य करते. या वनक्षेत्रांमुळे भूजल पातळी टिकून राहते, पाण्याचे स्रोत जिवंत राहतात आणि स्थानिक हवामान संतुलित राहण्यास मदत होते. कोकणातील अनेक देवराया आजही लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक परिसंस्थेचे जिवंत उदाहरणे आहेत. वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि विकास प्रकल्पांमुळे देवरायांवर मोठा दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे या पवित्र वनसंपदेचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. देवराई वाचवणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गसंपदा जपणे होय. प्रत्येक नागरिकाने देवराईचे महत्त्व ओळखून तिच्या संरक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
- प्रवीण सातोसकर, निसर्ग अभ्यासक.
---------------
42634
स्टॅलिन दयानंद

पवित्र वनराई या गाव, वन्यजीव आणि देव यांच्यातील अद्वितीय आध्यात्मिक नात्याचे प्रतीक आहेत. या वनराईतील प्राचीन वृक्ष आणि त्याभोवती वाढलेली लहान झाडे मिळून जंगलाचा अत्यंत घनदाट भाग तयार होत असे. गावाचा देव या वनराईत वास करतो आणि तो गावासह जंगलातील जीवसृष्टीचे रक्षण करतो, अशी श्रद्धा पिढ्यान्पिढ्या जपली गेली. मात्र, वाढत्या भौतिकतावादामुळे आणि लोभामुळे समाज अध्यात्मिक मूल्यांपासून दूर जात आहे. त्याचा परिणाम म्हणून समुदाय-आधारित संवर्धन व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलतोड आणि अतिक्रमणामुळे पवित्र वनराईंचा वेगाने ऱ्हास होत असून, त्याचा गावकऱ्यांच्या जीवनातील आध्यात्मिक आणि पर्यावरणीय समतोलावर गंभीर परिणाम होत आहे. आज अनेक देवरायांमध्ये झाडांची संख्या कमी झाली असून, शेकडो वर्षे उभे असलेले विशाल वृक्षही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पवित्र वनांचा ऱ्हास म्हणजे केवळ जंगलांचा नाश नव्हे, तर माणूस, निसर्ग आणि अध्यात्म यांच्यातील बंध तुटण्याची प्रक्रिया आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडतो आणि वन्यजीव मानव-वस्तींकडे येऊन संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे पश्चिम घाटातील पवित्र वनराईंचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.
- स्टॅलिन दयानंद, अध्यक्ष- वनशक्ती संस्था
--------------
42635
प्रा. चरणदास जोशिलकर

देवराई म्हणजे स्थानिक लोकांनी श्रद्धा, परंपरा आणि निसर्गसंवर्धनाच्या भावनेतून देवाच्या नावाने वर्षानुवर्षे जपलेले जंगल होय. या देवराया भूजल पुनर्भरण, औषधी वनस्पतींचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी व वन्यजीवांना देवरायांमुळे सुरक्षित अधिवास मिळतो. तसेच बारमाही पाण्याचे स्रोत टिकून राहण्यासही त्यांचा मोठा हातभार लागतो. मात्र, सध्या वाढते शहरीकरण, विकास प्रकल्प, जंगलतोड आणि नैसर्गिक ऱ्हास यामुळे देवरायांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे देवरायांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन ही काळाची गरज बनली आहे. देवराया केवळ पर्यावरणीयदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाच्या दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान आहेत. निसर्गाने देवरायांचे महत्त्व, त्यांचे पर्यावरणीय योगदान आणि संवर्धनाची आवश्यकता प्रभावीपणे अधोरेखित केली आहे. या नैसर्गिक व सांस्कृतिक संपत्तीचे जतन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
- प्रा. चरणदास जोशिलकर, कोल्हापूर

CM Car: महाराष्ट्र सदनात नव्या वाहनांची एन्ट्री होणार! मुख्यमंत्र्यांसाठी हायटेक बुलेटप्रूफ कार खरेदी करणार; सरकारचा मोठा निर्णय

Delhi Capitals: ‘हे अपयश जिव्हारी लागतं’; प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर दिल्ली कॅपिटल्समध्ये निराशा, वेणुगोपाल राव भावूक म्हणाले..

E-Scooter : 7 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर; एकदम कमी बजेट अन् 153 कि.मी. जबरदस्त रेंज, पाहा किंमत किती?

Thane Crime: नराधम बापाचा २ लेकींवर अत्याचार, लहान बहिणीवर अत्याचारानंतर मोठ्या मुलीने आईला सांगितल्यानं घटना उघड; डोंबिवलीत खळबळ

Latest Marathi News Live Update: नसरापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मोर्चा

SCROLL FOR NEXT