कोकण

मंडणगड - २५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

CD

rat10p16.jpg-
42660
मंडणगड ः आतले-तोंडली पुलाचे उद्घाटन करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम. शेजारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, प्रताप घोसाळकर आदी.
-----------

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
गृहराज्यमंत्री योगेश कदम; आतले-तोंडली पुलामुळे चार गावांच्या विकासाला नवा वेग
मंडणगड, ता. १० ः आतले-तोंडली दरम्यान भारजा नदीवरील या पुलाच्या रूपाने ग्रामस्थांची तब्बल पंचवीस वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झाली आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी सातत्याने केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. त्यामुळे या कामाचे श्रेय केवळ माझे नसून, सर्व ग्रामस्थांचे आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
भारजा नदीवरील आतले-तोंडली पुलाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे आतले, शेवरे, तोंडली आणि वडवली या गावांसह मंडणगड व दापोली तालुक्यांतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. कदम पुढे म्हणाले की, मंत्रिपदाच्या माध्यमातून केवळ मतदारसंघ नव्हे, तर संपूर्ण कोकणच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांपुरते समाधान मानता येणार नाही. बदलत्या काळानुसार शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे हीच खरी विकासाची संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, सदस्य अनिल रटाटे, दिप्ती घडशी, सिद्धेश देशपांडे, संजय शेडगे, सरपंच प्रमिला दळवी, चंद्रभागा जाधव, तुषार करवडे आदी उपस्थित होते.
--------------
चौकट
पुलाला हरिश्चंद्र कदम यांचे नाव
हा बहुप्रतीक्षित पूल व्हावा याचा दूरदृष्टीने विचार करणारे माजी सभापती व तोंडली ग्रामस्थ (कै.) हरिश्चंद्र कदम यांचे नाव पुलाला देण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी एकमुखाने केली. मंत्री योगेश कदम यांनी देखील त्याला सहमती दर्शवली असून, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT