42721
वन्यजीवांसाठी खेडमध्ये ‘पाणवठा’ उपक्रम
पोलिसांचा पुढाकार ; जंगलमय भागात पाण्याची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० ः कडाक्याच्या उन्हामुळे आटत चाललेले जलस्त्रोत आणि वन्यप्राणी-पक्ष्यांची होणारी पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी खेड पोलिसांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा आणि झाडांवर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
तालुक्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. ग्रामीण भागातील विहिरी, वहाळ आणि नदी-नाले कोरडे पडू लागल्याने केवळ मानवाचाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांचाही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. वन्यजीवांची ही परवड थांबवण्यासाठी पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी रहदारीच्या जंगलमय भागात आणि ठिकठिकाणी झाडांवर पाण्याचे स्रोत (पाणवठे) उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. जंगलातील मोक्याच्या ठिकाणी प्राण्यांसाठी पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. झाडांवर पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांची तहान भागवली जाणार आहे.
पाण्याअभावी वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता असते, तसेच अनेक पक्ष्यांचा मृत्यूही होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी आणि निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलिसांनी ही ''पाणी सेवा'' सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.