कोकण

‘कला आंगण’मुळे ठाकर संस्कृतीला वैभव

CD

42929


‘कला आंगण’मुळे ठाकर संस्कृतीला वैभव

तृप्ती धोडमिसे ः कुडाळात वर्धापन दिन सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या संस्थेच्या कार्यामुळे ठाकर संस्कृती टिकून राहिली आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जगभरात पोहोचली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. 
विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पिंगुळी गुढीपूर येथे केले होते. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, अनुराधा नारकर, समृद्धी चव्हाण, पंचायत समिती सदस्य देवगड, सुरेश रणसिंग, प्रवीण गंगावणे, दिल्ली चित्रकथी व गंजिफा कलेचा अभ्यास करणाऱ्या महिला विनती भाट, चेतन गंगावणे, भरत ठाकूर, अमित गंगावणे आदी उपस्थित होते.
यावेळी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणमार्फत देण्यात येणारा (कै.) शरद गरुड स्मृती पुरस्कार चित्रकार अक्षय सावंत (सावंतवाडी) यांना प्रदान केला. यावेळी पर्यटन, कला, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘कोकणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान केला. ठाकर आदिवासी समाजाच्या पोतराज व कळसूत्री बाहुली या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण झाले. ओंकार दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांच्या पौराणिक ‘सुवर्णमणी प्राप्ती’ या नाटकाने कार्यक्रमाचा समारोप झाला. एकनाथ गंगावणे यांनी सूत्रसंचालन केले.
----
कोकणची लोककला सातासमुद्रापार!
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी मी या संग्रहालयाला भेट दिली होती. आज माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून कोकणची लोककला सातासमुद्रापार पोहोचली आहे. कोकणी संस्कृतीचा एक वेगळा अनुभव घेता येत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT