कोकण

सह्याद्री संस्थेच्या ३६ शाळांचा निकाल ९७ टक्के

CD

-rat११p१.jpg -
P26O42776
स्वरा खातू

‘सह्याद्री’च्या ३६ शाळांचा निकाल ९७ टक्के
स्वरा खातू संस्थेत प्रथम; निकम विद्यालयाचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत सह्याद्री शिक्षणसंस्थेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा झेंडा फडकावला आहे. सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा खातू हिने ९८.२० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम येण्याचा मान पटकावला.
दहावीमध्ये संस्थेतील स्वरा ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम आली तर शौर्य टाकसाळे ९७ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि तेजस राऊत आणि हर्षवर्धन भिंगे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्या दोघांनाही ९६ टक्के गुण मिळाले आहेत.
सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या मराठी माध्यमाच्या ३३ आणि इंग्रजी माध्यमाच्या तीन अशा एकूण ३६ शाळांमधून १४७० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, संस्थेचा एकूण निकाल ९७ टक्के लागला आहे. संस्थेतील विशेष प्रावीण्य श्रेणी विद्यार्थी २९८, प्रथम श्रेणी विद्यार्थी ५५०, द्वितीय श्रेणीचे विद्यार्थी ४४८, तृतीय श्रेणीचे विद्यार्थी १३१ आहेत. ग्रामीण भागात शिक्षणप्रसार करणाऱ्या या संस्थेच्या यशाबद्दल अध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम आणि सचिव महेश महाडिक यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update : वांगी खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

Leopard Rescue : विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वनविभागाने केले रेस्क्यू

IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

SCROLL FOR NEXT