- ratchl११३.jpg -
P26O42812
चिपळूण ः माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत राबविण्यात आलेली स्वाक्षरी मोहीम
प्रदूषणाविरोधात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ
संघर्ष समितीचा फंडा; पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ः खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आता नागरिकांनी चिपळूणमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. चिपळूण शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर संकुल येथे सुरू झालेल्या या मोहिमेला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील पर्यावरणास घातक ठरणारा प्रकल्प त्वरित बंद करा, अशी मागणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या महिला आघाडीतर्फे करण्यात आली. रविवारी (ता. १०) माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समितीने लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः पिफास उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमुळे मानवी आरोग्य, हवा आणि पाणी धोक्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. यापूर्वी मोर्चे आणि धरणे आंदोलने करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने आता जनमताचा रेटा वाढवण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा मार्ग स्वीकारला आहे. या मोहिमेचे उद्घाटन हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘औद्योगिक विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत प्रदूषणकारी कंपन्यांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.’ ही मोहीम १२ मेपर्यंत चालणार असून, चिपळूणनंतर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. या प्रसंगी समितीचे भरत लब्धे, पंकज दळवी, तुळशीराम पवार, नगरसेविका सफा गोठे यांच्यासह सुमती जांभेकर, रविना गुजर, डॉ. रेहमत जबले आणि मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.