कोकण

''आयुष्यमान''मध्ये सिंधुदुर्गाची आघाडी कायम

CD

O43048

‘आयुष्यमान’मध्ये सिंधुदुर्गाची आघाडी कायम
कार्ड नोंदणी मोहीम : आतापर्यंत जिल्ह्याचे ६५ टक्के काम पूर्ण
नंदकुमार आयरे: सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ : जिल्ह्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड काढण्याच्या मोहिमेत राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. या योजनेचे आतापर्यंत ५ लाख २७ हजार १९७ कार्ड काढून ६५ टक्के काम पूर्ण केले आहे.
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकातील लाभार्थ्यांना घेता यावा, तसेच वैद्यकीय उपचारासाठी प्रति वर्ष प्रति कुटुंब पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत, यासाठी सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. आधार कार्डद्वारे केवायसी करून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत याला गती दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ८ लाख १४ हजार ४७९ लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ५ लाख २७ हजार १९७ लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. अद्यापही ३५ टक्के नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढलेले नाही. असे असले तरी, राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग सुरुवातीपासून पुढे राहिला असून आजही सिंधुदुर्ग जिल्ह्याने आघाडी कायम राखली आहे.
प्रत्येक नागरिकाचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी त्याच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही काही नागरिकांकडे आधार कार्ड नाही, तर काहींनी आपले आधार कार्ड केवायसी केलेले नाही. त्यामुळे यात अडचणी येत आहेत. राज्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यापाठोपाठ गडचिरोली ६० टक्के, तर गोंदिया ५७ टक्के काम झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांत अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.

चौकट
१३ शासकीय, १६ खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३ शासकीय आणि १६ खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जातात. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, सावंतवाडी, शिरोडा, वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय देवगड, दोडामार्ग,पेंडूर-कट्टा, मालवण, कुडाळ, वैभववाडी, महिला व बाल रुग्णालय कुडाळ तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोवा) व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जातो.योजनेत अंगीकृत खासगी रुग्णालये सुद्धा आहेत. यात गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली, डॉ. नागवेकर हॉस्पिटल कणकवली, संजीवनी हॉस्पिटल कणकवली, अंकुर हॉस्पिटल मालवण, लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे-कुडाळ, सुयश हॉस्पिटल कुडाळ, संजीवनी बाल रुग्णालय सावंतवाडी, डॉ. गद्रे आय केअर सेंटर वेंगुर्ला, विवेकानंद नेत्रालय कणकवली, कोकण कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, यशराज हॉस्पिटल सावंतवाडी, लेफ्टनंट यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय कुडाळ, श्रीराम हॉस्पिटल कुडाळ, राणे हॉस्पिटल कुडाळ, चितारी हॉस्पिटल सावंतवाडी, गेटवेल हॉस्पिटल कणकवली यांचा यात समावेश आहे.

कोट
सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना कार्ड काढण्याची मोहीम अविरत सुरू असून सर्व शासकीय रुग्णालयांसह आरोग्य केंद्र स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी अद्याप ज्या नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढलेले नाही, अशा नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आपले आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT