कोकण

सावंतवाडीत रविवारी सकल हिंदू संमेलन

CD

swt128.jpg
42990
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत माहिती देताना सुहास सातोस्कर व इतर मान्यवर.

सावंतवाडीत रविवारी
सकल हिंदू संमेलन
सावंतवाडी, ता. १२ ः भारतीय संस्कृती आणि हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या हेतूने येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी (ता.१७) सायंकाळी ४ वाजता भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू संमेलन समन्वयक समिती सावंतवाडीचे संयोजक सुहास सातोस्कर यांनी दिली.
या संमेलनासाठी वारकरी संप्रदायाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. शिवरत्न शेटे (अध्यक्ष, हिंदवी परिवार), ज्ञान प्रबोधनीचे मुख्य समन्वयक अमित नाईक आणि युवा कीर्तनकार सायली गावडे महाराज हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याचे नियोजन हिंदू संमेलन समन्वय समिती, सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संयोजक सुहास सातोस्कर, सहसंयोजक शांबा (अण्णा) म्हापसेकर, चंद्रशेखर पारधी, अपूर्वा माईणकर, अंजली नातू, चिन्मय रानडे, आनंद साधले असून ''हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया'' हा संकल्प घेऊन होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व माता, भगिनी आणि बांधवांनी मित्रपरिवारासह पारंपरिक मंगल वेषात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने केले आहे. यावेळी संयोजक सुहास सातोस्कर, अण्णा म्हापसेकर, अंजली नातू, किशोर नानिवडेकर, दिनेश गावडे, रोहन बांदेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: भारत हा महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार करणारा देश आहे - कदम

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT