कोकण

काविळतळी परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी

CD

काविळतळी भागात गतिरोधक बसवा
बांधकाम सभापतींना साकडे; युवासेनेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : शहरातील काविळतळी-कऱ्हाड रोड परिसरात वाढती वाहतूक आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांना देण्यात आले.
काविळतळी परिसरातील बांदल स्कूल, इंडियन जिम तसेच भोजने क्रेन समोरील रस्त्यावर दिवसभर मोठी रहदारी असते. या भागात शाळा असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची ये-जा सतत सुरू असते; मात्र, या मार्गावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विनोद पिल्ले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर पालिकेने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनीही व्यक्त केली आहे. या विषयीचे निवेदन देताना बालकल्याण उपसभापती राणी महाडिक, नगरसेवक गणेश आग्रे, मालकर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS प्रकरण; आरोपी तौसीफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT