कोकण

जिल्हा रुग्णालय अधीक्षकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

CD

जिल्हा रुग्णालय अधीक्षकावर
लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा
ओरोसमधील प्रकार; बिल मंजुरीसाठी कृत्य

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ : वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या येथील जिल्हा रुग्णालय कार्यालयीन अधीक्षकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मे रोजी सापळा रचून ही कारवाई केली होती. महादेव नारायण तेली (वय ५६, रा. स्वामी महादेव अपार्टमेंट, तेलीआळी, कणकवली) असे त्याचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक माळी यांनी दिलेली माहिती अशी ः तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, यात त्रुटी असल्याचे सांगून कार्यालयीन अधीक्षक तेली याने मंजुरीसाठी बिलाच्या तीन टक्के म्हणजेच १८ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपये ठरवली. तक्रारदाराने यासंदर्भात कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. विभागाने चार मे रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षातच सापळा रचला. ठरलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेलीला पकडले होते.
ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील व अपर अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलिस उपअधीक्षक विजय पांचाळ, निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, पूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाच घेतल्याप्रकरणी तेलीवर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT