कोकण

खेर्डीत ऐतिहासिक खोतीविरोधी परिषदेचा ८८ वा वर्धापन दिन

CD

खेर्डीत खोतीविरोधी परिषदेचा ८८वा वर्धापनदिन
चिपळूण ः तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण व मुंबई यांच्या वतीने खेर्डी येथील ऐतिहासिक हत्तीचा माळ येथे १६ मे रोजी संस्थेचा ८५वा वर्धापनदिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक खोतीविरोधी परिषदेच्या ८८व्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खेर्डी येथील हत्तीचा माळ (एमआयडीसी) येथे सकाळी १० ते ५ या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ऐतिहासिक खोतीविरोधी परिषदेच्या स्मरणार्थ भव्य क्रांतीस्तंभ उभारण्याची तसेच संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. सकाळी धम्मध्वजारोहण, बुद्धवंदना, खोतीविरोधी पुस्तिकेचे प्रकाशन तसेच परिषदेस सहकार्य करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार होणार आहे. दुपारनंतर ‘खोतीविरोधी परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व व समकालीन बेदखल कुळांचा प्रश्न’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. १६ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खेर्डी येथे ऐतिहासिक खोतीविरोधी परिषद घेतली होती. त्या घटनेला ८८ वर्षे पूर्ण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT